Posts

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

Image
ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार डॉ. दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी तथा आप्पासाहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले व प्रत्यक्ष भेटून २०२२ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला. पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. बालपणापासून त्यांना किर्तन, भजन व अध्यात्मिक वाचनाची आवड होती. त्यांचे वडील डॉ. नारायण धर्माधिकारी तथा नानासाहेब यांनी १९४३ पासून समाजसुधारणेच्या मुहूर्तमेढ रोवलेल्या कार्यास आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आणि आजही त्याच जोमाने व तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत.  मागील ३० वर्षांपासून ते निरुपण करीत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी विशेष बालसंस्कार बैठका सुरु केल्या तसेच आदिवासी पाड्या-वस्त्यांमध्ये बैठकांमार्फत अंधश्रध्दा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महान कार्य देखील करीत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण,

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा

Image
मकरसंक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरातून हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांमध्ये संघटन व्हावे, एकोपा वाढावा तसेच संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने आंबिवली-कल्याण येथील कोकणकर रहिवासी मंडळातील महिलांमार्फत रथसप्तमी दिनी हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून रथसप्तमी दिनी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे आंबिवली-कल्याण येथील कोकणकर रहिवासी मंडळातील महिलांकडून स्नेह व गोडवा वाढावा याकरीता तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेविका अस्मिता गोवळकर व लिलाबाई तरे या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. "सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करायला हवे, स्वत:चे रक्षण करायला हवे तसेच महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येणे काळाची गरज आहे" असे सामाजिक संदेशाचे वाण गोवळकर यांनी उपस्थित महिलांना दिले. मंडळाच्या सचिव इंद्रायणी भिके यांनी उपस्थितांचे स्वागत करुन रुचिता खाक्ये, उषा आयरे, मनिषा बंदरकर, दिपाली मोरये यांनी सर्व महिलांना मंडळामार्फत हळदी-कुंकू व वाण देऊन सन्

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

Image
कोकण, नागपूर व औरंगाबाद या विभागात शिक्षक मतदारसंघ तसेच नाशिक व अमरावती या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका २०२३ मध्ये होणार असल्याने, येत्या १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस त्यांचेसोबत उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते. राज्यात विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका दर सहा वर्षांनी घेतल्या जातात. त्याकरीता पात्र शिक्षक व पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने मतदार नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने, पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त नागरीक अर्ज क्र.- १८ भरुन पदवीधर मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https:/

निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ

Image
निवडणूकीचे कामकाज अत्यंत संवेदनशील, महत्त्वाचे आणि कालमर्यादेत पूर्ण करावयाचे असल्याने, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास निवडणूकीचे कामकाजाकरीता शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात कंत्राटी पध्दतीने शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या पात्र कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक केली जात होती. परंतु, ठाणे जिल्ह्यातील '१३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात' निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती वर्षा नाईक थळकर, यांनी मागील एक वर्षापासून शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या अपात्र असलेल्या एका कॉम्प्युटर ऑपरेटरची नेमणूक करुन भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेस हरताळ फासल्याने मतदार यादीत मतदाराच्या नावासमोर त्याच्या फोटो ऐवजी वयासंबधीचे घोषणापत्र अपलोड केल्याचे तसेच मतदार रहात असलेल्या ठिकाणच्या यादी भागात नोंदणी न करता भलत्याच ठिकाणच्या यादी भागात नोंदणी करुन मतदारांना त्रास दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत उप जिल्हाध

पंढरपूर एस टी बससेवा ४८ तास बंद

Image
          एचपी न्यूज टीम (सोलापूर) -: वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनांमार्फत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवारी पंढरपूर विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्याचे योजनेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पंढरपूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवावी, असे पत्र विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिले.            कोरोना महामारीमुळे २३ मार्च पासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक सेवा राज्य परिवहन महामंडळाने काही दिवसांपूर्वीच सुरु केली. अशातच राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर बाजारपेठा, प्रवासी वाहतूक, हॉटेल्स-मॉल्स वगैरे उद्योगांना परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्यास व भजन-कीर्तनास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी उद्या सोमवारी ३१ तारखेला पंढरीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनेतर्फे मंदीर प्रवेश आंदोलन केले जाणार आहे.            कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात महामंडळाच्या एस.टी. बसेसची तोडफोड केली जाते. त्यामुळे  उद्या होणाऱ्या आंदोलनात तोडफोडीमुळे एस.टी.बसेसचे होणारे नुकसान टाळण्या

कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

Image
(एचपी न्यूज-: २७ ऑगस्ट) MTDC व इंडियन हॉटेल प्रा. लि.(ताज ग्रुप) यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्याकरीता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.           महाविकास आघाडी सरकारने थोड्याच कालावधीत मागील दोन दशकांपासून पर्यटनाला चालना देण्यासाठी वाट पाहत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पंचतारांकित पर्यटन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (ताज ग्रुप) यांच्यात लीज डीड व सबलीज डीड असे दोन करार करण्यात आले. शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुकास्थित मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी ५४•४० हेक्टर जमीन ९० वर्षांसाठी भाडेपट्टयाने देण्याकरीता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली असून इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशातील व परदेशातील पर्यटक आकर्षित होतील तसेच यामुळे रोजगार निर्मिती

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन

Image
शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते "शिवसेना दैनंदिनी २०२०" चे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, दैनंदिन निर्मिती प्रमुख जी.एस.परब, शरद पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते .