निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार डॉ. दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी तथा आप्पासाहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले व प्रत्यक्ष भेटून २०२२ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला.

पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. बालपणापासून त्यांना किर्तन, भजन व अध्यात्मिक वाचनाची आवड होती. त्यांचे वडील डॉ. नारायण धर्माधिकारी तथा नानासाहेब यांनी १९४३ पासून समाजसुधारणेच्या मुहूर्तमेढ रोवलेल्या कार्यास आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आणि आजही त्याच जोमाने व तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत. 

मागील ३० वर्षांपासून ते निरुपण करीत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी विशेष बालसंस्कार बैठका सुरु केल्या तसेच आदिवासी पाड्या-वस्त्यांमध्ये बैठकांमार्फत अंधश्रध्दा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महान कार्य देखील करीत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान तसेच रक्तदान शिबीर अशा अनेक उपक्रमाचे आयोजन त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवा दरम्यान होणाऱ्या निर्माल्यामधून खतनिर्मिती करुन एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला असून, आप्पासाहेब हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

Comments

Popular posts from this blog

कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा