पंढरपूर एस टी बससेवा ४८ तास बंद

          एचपी न्यूज टीम (सोलापूर) -: वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनांमार्फत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवारी पंढरपूर विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्याचे योजनेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पंढरपूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवावी, असे पत्र विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिले. 
          कोरोना महामारीमुळे २३ मार्च पासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक सेवा राज्य परिवहन महामंडळाने काही दिवसांपूर्वीच सुरु केली. अशातच राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर बाजारपेठा, प्रवासी वाहतूक, हॉटेल्स-मॉल्स वगैरे उद्योगांना परवानगी दिली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्यास व भजन-कीर्तनास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी उद्या सोमवारी ३१ तारखेला पंढरीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी संघटनेतर्फे मंदीर प्रवेश आंदोलन केले जाणार आहे. 
          कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात महामंडळाच्या एस.टी. बसेसची तोडफोड केली जाते. त्यामुळे  उद्या होणाऱ्या आंदोलनात तोडफोडीमुळे एस.टी.बसेसचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बस वाहतूक रविवार (ता.३० ऑगस्ट) रात्रौ १२ ते सोमवार (ता.३१ ऑगस्ट) रात्रौ १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभाग नियंत्रकांना पत्र दिले असल्याने, पंढरपूर - सोलापूर, सोलापूर - पंढरपूर, पुणे - पंढरपूर एस.टी. बस वाहतूक ४८ तासांकरीता बंद राहील, असे सोलापूर एस.टी. विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा