वाहनांचे सर्व परवाने व नोंदणीकरीता मुदतवाढ

एचपी न्यूज -: संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता वाहन चालक व मालकांना वाहनाचे सर्व प्रकारचे फिटनेस, परवाना व नोंदणीकरीता केंद्र शासनाकडून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
सध्या कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनाचे फिटनेस, सर्व प्रकारचे परमिट, परवाना, नोंदणी व इतर संबंधित कागदपत्रांची ३० सप्टेंबर २०२० पर्यंत असणारी वैधतेची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली असल्याचे जाहीर केले आहे. मंत्रालयाने अगोदर ३० मार्च व ९ जून रोजी मुदतवाढीबाबत सूचना प्रसारित केली होती. त्यात फिटनेस व सर्व प्रकारचे परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत असल्याचे सांगितले होते. परंतु ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन चालक व मालकांना सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याचे वाहन चालक व मालकांकडून बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा