मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन

           एचपी न्यूज-: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपादृष्टीने सन १९९३ साली शिवसेना दैनंदिनी प्रथमच प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर सलग २८ वर्षे शिवसेना दैनंदिनी प्रकाशित करण्यात येत असून, नुकतेच शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनी २०२० चे प्रकाशन करण्यात आले.

           शिवसेना दैनंदिनी २०२० या आवृत्तीत जीवनावश्यक उपयुक्त माहिती तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्राचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला संघटक आणि शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संस्था व संघटना तसेच इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले असून या दैनंदिनी निर्मितीमध्ये जी. एस. परब व शरद पवार यांचे विशेष कार्य असल्याचे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा