बाजारात स्वस्त नवीन इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध

एचपी न्यूज (मुंबई-२१ ऑगस्ट २०२०) -: कोरोना महामारीमुळे देशभर मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने या मंदीच्या काळात स्वस्तात मस्त अशा गाड्यांची मागणी वाढली आहे. खासकरुन इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे *DETEL INDIA* ने  भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे.

DETEL INDIA ने यापूर्वी LED TV लाँच केला होता. त्यानंतर आता दुचाकी क्षेत्रात उडी घेत सर्वात स्वस्त आणि मस्त अशी इलेक्ट्रिक बाइक/मोपेड आणली आहे. ही मोपेड दिसायला आकर्षक असून तिची किंमत रु. १९,९९९/= +GST असेल व मोपेडने प्रवास करत असताना फक्त २० पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल असा दावा कंपनीने केला आहे.

या इलेक्ट्रिक मोपेड खरेदी करीता कंपनीच्या *b2badda.com* या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली असून ऑनलाइनने  विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ही बाइक EMI वर घेण्यासाठी Bajaj Finserv ने चांगला प्लॅन दिला आहे. या कंपनीने Bajaj Finserv सोबत नवीन ऑफर सुद्धा आणली आहे.  

Detel Easy इलेक्ट्रिक मोपेड बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅटेलिक रेड रंग दिले आहे. काही वस्तू ठेवण्यासाठी बाइक मध्ये एक बास्केट दिली आहे. तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सपोर्ट दिला आहे. या व्यतिरिक्त उंचीनुसार सीट कमी जास्त करण्याची व्यवस्थाही आहे. या मोपेडमध्ये 250 W  क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली असून यात 48 V इतकी क्षमता आहे. आणि 12 AH LiFePO4 बॅटरीचा वापर केला आहे. या मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ७ ते ८ तास लागत असून एकदा फूल चार्ज केल्यावर ६० किमी इतका प्रवास करु शकते व या मोपेडचा करण्याची कोणतीही गरज नाही.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा