तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


दोडामार्ग, दिनांक १७ ऑगस्ट २०२०-:  मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका येथील तिलारी नदीची इशारा पातळी ४१•६० मीटर असून धोका पातळी ४३•६० मीटर आहे. सध्या नदीची पातळी ४१•२० मीटर झाल्याने व हवामान विभागाने दि.२० ऑगस्ट २०२० पर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने आणि सध्या ११०•१० मीटर पाण्याची पातळी असलेल्या तिलारी धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या घोटगे, कुडासे, मनेरी, घोटेवाडी, कोनाळकट्टा या ठिकाणच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी व संबंधित गावच्या ग्रामपंचायतींनी कच्च्या घरात व सखल ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची योग्य ती दक्षता घेऊन पाणी पातळीत वाढ झाल्यास संबंधित नागरिकांना लगेचच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास तिलारी नदीच्या पुलावरुन वाहतूक होणार नाही याची काळजी घेऊन, तालुक्यातील शोध-बचाव कार्य गटातील पोहणाऱ्या सदस्यांच्या नेमणुकीसह होड्या व शोध-बचावकार्य साहित्य उपलब्धतेची व्यवस्था करावी अशी सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा