तहसिलदार बदलीसाठी पत्रकारांचे उपोषण

 


एचपी न्यूज टीम (शहापूर १५ ऑगस्ट) :-  शहापूरच्या तहसिलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारा विरोधात शहापूर तालुका पत्रकारांनी काळी फीत लावून अनिश्चित काळाकरिता आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

सध्या पसरलेल्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात त्या अपयशी ठरल्या असून तालुक्यातील विकास कामात खीळ घालणे, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच तालुक्यातील बहुतांश अशिक्षित सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक यामुळे लोकांमध्ये तहसिलदार निलिमा सूर्यवंशी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली असून त्यांच्या निष्क्रियते विरोधात व त्यांच्या बदली करीता आज स्वातंत्र्य दिनापासून शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी प्रत्येक दिवशी चार याप्रमाणे अनिश्चित काळाकरिता साखळी उपोषण सुरू केले आहे.

कोरोना महामारीमुळे शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करीत दररोज चार याप्रमाणे पत्रकार साखळी उपोषणास बसतील. त्यांच्या या उपोषणास सामाजिक व सर्व राजकीय स्तरातून पूर्णपणे पाठिंबा मिळाला असून सर्वसामान्य लोकांकडूनही समर्थन मिळत असल्याचे पत्रकार प्रशांत गडगे, रविंद्र लकडे, सुनील घरत, दिलीप वाकुटे आदींनी सांगितले. याप्रसंगी आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोज विषे, निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्थेचे सदस्य, कुणबी समाज सेवा संस्थेची सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे सदस्य, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून पत्रकारांचे तहसिलदार हटाव आंदोलनास पाठिंबा दर्शविला.


Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोकणकर रहिवासी मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ साजरा