Posts

Showing posts from February, 2023

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

Image
ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार डॉ. दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी तथा आप्पासाहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले व प्रत्यक्ष भेटून २०२२ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला. पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. बालपणापासून त्यांना किर्तन, भजन व अध्यात्मिक वाचनाची आवड होती. त्यांचे वडील डॉ. नारायण धर्माधिकारी तथा नानासाहेब यांनी १९४३ पासून समाजसुधारणेच्या मुहूर्तमेढ रोवलेल्या कार्यास आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आणि आजही त्याच जोमाने व तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत.  मागील ३० वर्षांपासून ते निरुपण करीत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी विशेष बालसंस्कार बैठका सुरु केल्या तसेच आदिवासी पाड्या-वस्त्यांमध्ये बैठकांमार्फत अंधश्रध्दा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महान कार्य देखील करीत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण,