निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ

निवडणूकीचे कामकाज अत्यंत संवेदनशील, महत्त्वाचे आणि कालमर्यादेत पूर्ण करावयाचे असल्याने, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास निवडणूकीचे कामकाजाकरीता शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात कंत्राटी पध्दतीने शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या पात्र कॉम्प्युटर ऑपरेटर्सची नेमणूक केली जात होती. परंतु, ठाणे जिल्ह्यातील '१३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात' निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती वर्षा नाईक थळकर, यांनी मागील एक वर्षापासून शैक्षणिक व तांत्रिकदृष्ट्या अपात्र असलेल्या एका कॉम्प्युटर ऑपरेटरची नेमणूक करुन भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेस हरताळ फासल्याने मतदार यादीत मतदाराच्या नावासमोर त्याच्या फोटो ऐवजी वयासंबधीचे घोषणापत्र अपलोड केल्याचे तसेच मतदार रहात असलेल्या ठिकाणच्या यादी भागात नोंदणी न करता भलत्याच ठिकाणच्या यादी भागात नोंदणी करुन मतदारांना त्रास दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत उप जिल्हाध...