Posts

Showing posts from September, 2022

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन

Image
कोकण, नागपूर व औरंगाबाद या विभागात शिक्षक मतदारसंघ तसेच नाशिक व अमरावती या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका २०२३ मध्ये होणार असल्याने, येत्या १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस त्यांचेसोबत उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते. राज्यात विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका दर सहा वर्षांनी घेतल्या जातात. त्याकरीता पात्र शिक्षक व पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने मतदार नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने, पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त नागरीक अर्ज क्र.- १८ भरुन पदवीधर मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https:/...